शेर्ले जुना कापईपूल दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली
भातशेतीचे मोठे नुकसान *ð«बांदा दि.२४-:* गुरूवारी मध्यरात्री तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शेर्ले कापईवाडीत व गावात पाणी शिरले होते. शनिवारी दुसऱ्या दिवशी जुना कापई पुलावर एक पुरुषभर पाणी होते. आलेल्या महापुरामुळे परिसरातील भात शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागच्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा दशक्रोशील झोडपले. तेरेखोल नदीच्या पाण्याने शेर्ले नदीला महापूर आला….
