*⚡कणकवली ता.०५-:* दिवाळी पाडव्या दिवशी राष्ट्रवादी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि कुटुंबीयांची भेट सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेते तथा कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक अबीद नाईक यांनी बारामती येथे जात घेतली. यावेळी राष्ट्रवादी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. बारामती येथे दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट राष्ट्रवादी अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व पवार कुटुंबीय बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी घेत असतात.राष्ट्रवादीचे नेते तथा कणकवली नगरसेवक अबिद नाईक यांनी बारामती येथे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे ,आमदार रोहित पवार व पवार कुटुंबियांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी शरद पवार व कुटुंबीयांनी आपुलकीने अबिद नाईक यांच्याशी सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी संघटने संदर्भात चौकशी केली व व्यवस्थित सांभाळून प्रवास करा अशी सूचना केली .यावेळी अमित केतकर ,विशाल ठाणेकर उपस्थित होते.
बारामती येथे दाखल होत राष्ट्रवादी नेते अबीद नाईक यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार व कुटुंबीयांची घेतली भेट
