नांदगाव व्यापारी, खोका, रिक्षासंघटनेतर्फे विविध कार्यक्रम साजरे

*⚡कणकवली ता.०५-:* नांदगाव व्यापारी, खोका, रिक्षा संघटनेच्या वतीने लक्ष्मीपुजनानिमित्त श्री . सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते तसेच यानिमित्ताने डबलभारी भजनाचा जंगी सामनाचे ही आयोजन करण्यात आले होते .सायंकाळी बुवा देवेंद्र इस्वलकर विरुद्ध बुवा समीर गावडे यांच्यात डबलभारी सामना झाला. यावेळी नांदगाव व्यापारी संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे नुतन जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. सायंकाळ नंतर विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या आहेत यामध्ये आमदार वैभव नाईक, सभापती श्री मनोज रावराणे, माजी सभापती तुळशीदास रावराणे,माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये , नगरसेवक सुशांत नाईक ,पं.स.सदस्या सौ हर्षदा वाळके आदी पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी नांदगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पंढरी वायंगणकर, माजी अध्यक्ष सुभाष बिडये,उपाध्यक्ष मारुती मोरये,कमलाकर महाडिक,दाजी सदडेकर , भाई मोरजकर, ऋषिकेश मोरजकर , गोपाळ मोरये,संजय मोरये, अब्दुल नावलेकर ,बक्कर नावलेकर, सुनिल साळुंखे, अनिल बांदेकर,हसन साटविलकर,अब्दुल रहिमान नावलेकर ,श्री.कराळे, संतोष बिडये ,समिर बोभाटे , श्रीकांत टाकळे,पप्पी सापळे,यासिर मास्के ,राजा कांडर तसेच आदी पदाधिकारी गामस्थ व्यापारी ,खोका, रिक्षा,मेझिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page