*⚡सावंतवाडी ता.०५-:* तालुक्यात लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम गुरुवारी उत्साहात पार पडला. घराघरामध्ये तसेच दुकानें, विविध कार्यालये, शाळा आदी ठिकाणी लक्ष्मीपूजन करण्यात आले. दिवाळी हा सण राज्यासह देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही या सणावर कोरोनाचे सावट असताना त्याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. घरोघरी तसेच गल्लीबोळात, शहरांमध्ये नेत्रादीपक रोषणाई करण्यात आली आहे. सध्याच्या मंदीच्या काळातही नागरिकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. // नरकचतुर्थीनंतर आलेला लक्ष्मीपूजन उत्सव काल उत्साहात झाला. लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करून परंपरेप्रमाणे बताशे, पेढे तर काही ठिकाणी चॉकलेट वाटण्यात आली. बच्चेकंपनी दुकानादुकानात जाऊन चॉकलेट गोळा करीत होती. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरु होता. सायंकाळी मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे मात्र काहीवेळ खोळंबा झाला होता.
सावंतवाडी तालुक्यात लक्ष्मीपूजन उत्साहात
