वेत्ये येथे डबलबारी भजनाचे आयोजन…

सावंतवाडी-:दिवाळी पाडवा सणाचे औचित्य साधत आज श्री देव कलेश्वर पूर्वी देवी मंदिर वेत्ये येथे डबलबारी भजन सामना श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मित्रमंडळ यांच्याकडून आयोजित करण्यात आला आहे. बुवा श्री. विजय उर्फ गुंडू सावंत आणि बुवा श्री. विनोद चव्हाण यांच्यात हा सामना रंगणार असून, भजन प्रेमींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page