कणकवली वरचीवाडी येथ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले भूमिपूजन

*⚡कणकवली ता.०५-:* कणकवली शहरातील वरचीवाडी नरडवे रोड ते पोतदार स्कूलकडे जाणार्‍या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे सुरू करण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, न.पं.च्या आरोग्य समितीचे सभापती संजय कामतेकर, बांधकाम समितीचे सभापती अ‍ॅड विराज भोसले, नगरसेवक अभिजीत मुसळे, रवींद्र गायकवाड, कविता सावंत, माजी नगरसेवक किशोर राणे, बंडू गांगण, संदीप राणे, जावेद शेख, अनिल पवार, आबा पिळणकर, आबा केरकर, संजना सदडेकर, राजू पिळणकर, विशाल आमडोस्कर, महेश आमडोस्कर, श्यामा आमडोस्कर, बाळा सावंत, सुधीर धुमाळे, संजय सदडेकर,रमेश पारकर,बाबू गुरव आदी उपस्थित होते. कणकवली विकासासाठी मी कटिबद्ध आहे. शहरातील दळणवळणच्या सुविधा होण्यासाठी चांगले रस्ते निर्माण करण्याचे काम न.पं.च्या माध्यमातून केले जात आहे. यापुढील काळात या रस्त्यालगत स्ट्रीट लाईटचे काम मार्गी लावण्यात येईल.तसेच शहरात होणार्‍या विकासकामांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. हा रस्ता नगरोत्थान योजनेमधून करण्यात येत असून या कामासाठी ५४ लाख ५० हजार एवढा खर्च करण्यात येणार आहे. या कामातंर्गत रस्त्यालगत दोन्हीबाजुंना आसीसी काँक्रीटचे गटार तयार केले जाणार आहे.

You cannot copy content of this page