राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली कोरडी भाऊबीज साजरी

इंधन व गॅस दरवाढ विरोधात केली घोषणाबाजी

*⚡सावंतवाडी ता.०५-:* इंधन दरवाढी विरोधात आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून कोरडी भाऊबीज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली. यावेळी वाढलेल्या पेट्रोल, डिझेल, गॅस च्या किमती कमी करून देशातील बहिणींना भाऊबीज भेट द्यावी अशी मागणी केली आहे. पंत प्रधान मोदी यांनी इंधनावर ५० रुपये वाढवून ५ रुपये कमी केले आहेत. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

You cannot copy content of this page