राष्ट्रवादीच्या सिंधुदूर्ग जिल्हा युवती अध्यक्षपदी सौ. सावली पाटकर यांची नियुक्ती

राष्ट्रवादी च्या नेत्या अर्चना घारे परब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

*⚡सावंतवाडी ता.०५-:* राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा युवती काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी सौ. सावली सचिन पाटकर यांची नियुक्ती आज करण्यात आली असून, याबाबतचे नियुक्ती पत्र माजी राज्यमंत्री प्रविण भोसले व विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा अर्चना घारे परब यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, अर्चना घारे परब यांनी केलेल्या शिफारशीनुसार खासदार सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी ही नियुक्ती केली आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, युवती तालुका अध्यक्ष जहिरा ख्वाजा, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन पाटकर, सौ. दर्शना बाबर देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page