Headlines

Global Maharashtra Breaking News

वेर्ले येथील आरोग्य शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद…

अटल प्रतिष्ठान व आजी- माजी सैनिक उत्कर्ष मंडळ यांचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.१२-: सह्याद्रीच्या कुशीतील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या वेर्ले या गावात अटल प्रतिष्ठान व आजी माजी सैनिक उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वेर्लेसह शिरशिंगे, ओवाळिये, कलमिस्त या गावातील सुमारे तीनशेहून जास्त रुग्णांनी लाभ घेतला.अटल प्रतिष्ठानचे विश्वस्त व…

Read Full News

घे भरारी फाउंडेशनच्या मोफत झुंबा प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी, ता.१२-:घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने महिलां व मुलींसाठी विशेष झुंबा प्रशिक्षण उपक्रम मागील महिनाभर यशस्वीरीत्या राबविण्यात आला. कोणताही मोबदला न घेता आयोजित केलेल्या या उपक्रमाला सावंतवाडी तसेच परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, त्यांच्या आरोग्यवृद्धीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. या उपक्रमाचा समारोप काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे उत्साहात पार पडला. यावेळी सहभागी…

Read Full News

आंबोली घाटात भीषण अपघात : ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू, दोघे जखमी…

⚡आंबोली,ता.१२-: आंबोली घाटात ७ व्या किलोमीटर वर आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकी वरील निकिता प्रसाद राऊत (वय११) हि जागीच ठार झाली तर अन्य दोघे जखमी झाले. आंबोली घाटात ११ च्या दरम्यान ७ व्या किलोमीटर वर वळणावर फरशी भरलेल्या वेगाने जाणाऱ्या आयषर टेम्पो ने ओव्हर टेक करताना ठोकरले. या दुचाकी वर आंबोली…

Read Full News

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड…

सावंतवाडी : अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार तथा ‘लोकसंवाद लाईव्ह’चे संपादक समिल जळवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सीताराम गावडे यांनी श्री. जळवी यांच्या निवडीची घोषणा आज केली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण,…

Read Full News

सिंधुदुर्ग व्हॉईस ऑफ मीडिया: मुख्यालय जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर…

⚡सावंतवाडी ता.१२-: पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) या आंतरराष्ट्रीय संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली असून जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी शैलेश मयेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी मयेकर यांच्या नेतृत्वाखालील नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा…

Read Full News

कुडाळमध्ये ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’चा थाटात शुभारंभ…

⚡​कुडाळ ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी केंद्र असलेल्या कुडाळ शहरात आता खऱ्या अर्थाने आईस्क्रीम प्रेमींची चंगळ होणार आहे. कुडाळ मध्ये आशीर्वाद अव्हेन्यू येथे ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’ या अद्ययावत आईस्क्रीम पार्लरचा भव्य शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि आईस्क्रीम प्रेमींच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.​या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. टॅक्स कन्सलटंट भूषण तेजम,…

Read Full News

मुलांनी तन, मन, धन अर्पून उत्तम शिक्षम घेत प्रगती साधावी…

दत्ता सामंत:वराडकर हायस्कुलच्या शतकमहोत्सवाचा शुभारंभ.. मालवण दि प्रतिनिधीस्व. डॉ. काकासाहेब वराडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी दूरदृष्टी ठेवून वराडकर हायस्कुल रुपी लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. विविध क्षेत्रातील माणसे या शिक्षणसंस्थेवर कार्यरत आहेत. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे, शिक्षकांना गुरुस्थानी मानले पाहिजे. मुलांनी तन, मन, धन अर्पून उत्तम शिक्षण घेत प्रगती साधावी. शाळेच्या विविध शैक्षणिक…

Read Full News

तरुणांच्या आत्महत्यांवर संवेदनशील वृत्तांकनाची गरज…

दयानंद कुबल यांचे आवाहन.. ⚡बांदा ता.११-: सावंतवाडी तालुक्यात अलीकडच्या काळात तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले असून, या गंभीर परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल यांनी चिंता व्यक्त केली आहे. अशा घटना घडल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्या बातम्यांना अनावश्यक प्रसिद्धी किंवा सनसनाटी स्वरूप देण्याऐवजी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. आत्महत्यांच्या बातम्यांचे वारंवार आणि ठळकपणे होणारे वृत्तांकन…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत शहरात ‘प्लास्टिक बंदी’ धडक मोहिम…

२० किलो प्लास्टिक जप्त ;५ हजार दंड वसूल.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत पर्यावरण रक्षणासाठी आणि शहराला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी शहरात ‘प्लास्टिक बंदी मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या विविध भागांत कडक तपासणी करून बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतः वेंगुर्ला…

Read Full News

ठाकरे सेना तालुका प्रमुख राजन नाईक यांच्यासह १२ जणांची निर्दोष मुक्तता…

कुडाळ : जनआशीर्वाद यात्रे दरम्यान माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झेंडे दाखवणे व घोषणाबाजी केलेल्या प्रकरणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख राजन नाईक यांच्या सह 12 जणांची कुडाळ न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली.याबाबत राजन नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 2021 मध्ये केंद्रीय मंत्री झाल्यानंतर…

Read Full News

You cannot copy content of this page