मनीष दळवी: रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, २० लाखांचा निधी मंजूर..
⚡सावंतवाडी ता.२७-:
वेत्ये गावाच्या विकासाठी जिल्हा बँकेचा अध्यक्ष या नात्याने आपण नेहमी प्रयत्नशील आहे. भविष्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मनीष दळवी यांनी वेत्ये येथे आज दिली.पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या इन्सुली क्षेत्रफळ वेत्ये या रस्त्याचे भुमिपुजन प्रंसगी ते बोलत होते.
वेत्ये गावातून जाणार्या इन्सुली क्षेत्रफळ, सोनुर्ली हा रस्ता पुर्णतः खराब झाला होता. खड्डेमय झालेल्या रस्त्यावरुन वाहने चालविणे कठिण झाले होते. त्यामुळे हा रस्ता नव्याने व्हावा यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनकडे पंचायत समिती सदस्य जितेद्र गावकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला केला. त्याला यश येऊन तब्बल 20 लाखाचा निधी मंजूर झाला होता. आज या कामाचे भूमिपूजन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत,पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच नरेंद्र नरेद्र मिठंबावकर, माजी पंचायत समिती सभापती रमेश गावकर, बाबुराव तेंडोलकर,गोविंद गावडे आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. खड्डेमय झालेला रस्ता नव्याने रस्ता मंजूर झाल्याने वेत्ये ग्रामस्थातून तसेच या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकातून समाधान व्यक्त करण्यात आले.
