Headlines

Global Maharashtra Breaking News

पडवणे येथे ऑलिव्ह रिडले कासवाला जीवदान

वनविभागाच्यावतीने देवगड समुद्रात आले सोडण्यात* *💫देवगड दि.२७-:* पडवणे बीचवरती परदेशी पर्यटक यांना जखमी अवस्थेत आढळलेल्या ऑलिव्ह रिडले कासवावर त्वरीत उपचार करुन रेस्क्यू टिमच्यामदतीने सदर कासवाला देवगड बंदर समोरील समुद्रात सुखरूपपणे वनविभागाच्यावतीने जीवनदान देण्यात आले. पडवणे बीच वर परदेशी पर्यटक जोसेफ कोबुन व थॉमस यांना जखमी ऑलिव्ह रिडले कासव आढळले त्यांनी वनविभाग अधिकारी लिमये साहेब यांना संपर्क साधला व  त्यानंतर  सर्व सूत्र हलून वनविभाग सावंतवाडी उपवनसंरक्षक यांना फोनवरून संपर्क साधला गेला व त्यानंतर कणकवली वनविभागाचे वनक्षेत्रपाल घुणकीकर यांनी घटनास्थळी पडवणे येथे भेट दिली. त्याचवेळी महाड – चिपळूण येथे रेस्क्यू ऑपरेशन साठी आलेल्या पुणे येथील रेस्क्यू टिम आपले काम आटोपून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेली होती. सदर  टिम ही ॲनिमल रेस्क्यू  चॅरिटेबल ट्रस्ट ची पुणे बावधन येथील  एक रेस्क्यू टिम होती. त्यांनी पडवणे येथे जाऊन जखमी ऑलिव्ह रिडले कासवावर त्वरीत उपचार केले. या कासवाचा पुढील एक डावा पाय नव्हता व मागील उजवा पाय देखील कट झाला होता. तसेच डोळ्याला  छोटीशी जखम झाली होती. या ॲनिमल रेस्क्यू टिम मध्ये तुहिन सातारकर , डॉ.निकिता मेहता , विश्वेश महाजन, हर्षद नागवे ,निखिल  पाटील, नरेश चांडक यांचा समावेश होता.त्यांच्यासोबत  कणकवली देवगड क्षेत्राचे वनपाल  मुळे सर होते . त्यांनी सदर कासव व्यवस्थित झाल्यावर  तारामुंबरी येथील बीच वर सोडण्याचा प्रयत्न केला.परंतू  रेस्क्यू टिम ला देवगड येथे फायबर पात उपलब्ध झाल्याने सदर कासव नौका मालक ललितेश खडपकर यांच्या फायबरच्या पातीने देवगड बंदर समोरील समुद्रात सुखरूप पणे सोडण्यात आले. यावेळी सदर टिमला ललितेश खडपकर,अवि खडपकर, रुपेश कुबडे यांनी तर तारामुंबरी येथील भैरवनाथ बचत गटाच्या महिला प्रियांका तारी , प्रियांका खवळे तसेच कासव मित्र अक्षय खवळे ,दिपक खवळे व हितेश खवळे आणि तारामुंबरी  कांदळवन समिती सदस्य लक्ष्मण तारी यांनी सर्वतोपरी सहाय्य केले. यावेळी तारामुंबरी कांदळवन प्रकल्प समन्वयक  योगिता शेरे या देखील उपस्थित

Read More

सावंतवाडी आगारातून पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, रत्नागिरी बस सेवा सुरु

आगार प्रमुख वैभव पडोळे यांची माहिती* *💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी आगारातून आजपासून पुणे, तुळजापूर, कोल्हापूर, रत्नागिरी मार्गांवरील बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत, अशी महिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली.. सायंकाळी ६.४५ वाजता सावंतवाडी-पुणे निगडी (आंबोलीमार्गे) (शिवशाही), सकाळी ७.१५ वाजता सावंतवाडी-पुणे निगडी (आंबोलीमार्गे), सकाळी ९ वाजता सावंतवाडी-तुळजापूर (आंबोलीमार्गे), दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी-कोल्हापूर (आंबोलीमार्गे), सकाळी ७…

Read More

वक्तृत्व व कथाकथन स्पर्धेत नील बांदेकरचे राज्यस्तरीय सुयश

*💫बांदा दि.२७-:* सध्याच्या लाॅकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी ग्रोइंग डाॅटस असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्राची गौरवगाथा या विषयाशी निगडित कोणत्याही कलेचे सादरीकरण करावयाच्या स्पर्धेत बांदा नं. १ केंद्रशाळेतील इयत्ता तिसरी मध्ये शिकत असलेल्या नील नितीन बांदेकर याने महाराष्ट्रातील शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग अतिशय उत्कृष्टरित्या सादर करुन संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.त्याला रोख…

Read More

कणकवली नगरपंचायतीच्या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीच घराचा रस्ता दाखवा

कणकवली शहरात शिवसंपर्क अभियान शुभारंभप्रसंगी संदेश पारकर यांचे आवाहन *💫कणकवली दि२७-:* कणकवली नगरपंचायतीच्या कारभार्‍यांना आगामी निवडणुकीच घराचा रस्ता दाखविण्याचा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शिवसैनिकांनी करावा. तसेच सत्तेचा गैरवापर करून कारभार्‍यांनी केलेल्या गैरव्यवहारांची माहिती शिवसैनिकांनी जनतेपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेकडून मत्स्य अधिकाऱ्यांचा सत्कार

*💫मालवण दि.२७-:* राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात शिवसेनेतर्फे मत्स्य व्यवसाय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त रवींद्र मालवणकर, सहायक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, श्रुतिका गावडे, आश्लेषा गोळवणकर यांचा सत्कार करण्यात आला. तौक्ते वादळात नुकसान ग्रस्त झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मत्स्य अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्या बरोबरच इतर सहकार्य केले. म्हणूनच आज मच्छीमारांना…

Read More

करूळ घाटमार्ग वाहतुकीला खुला

वाहनचालकआणि प्रवाशांना दिलासा *💫वैभववाडी दि२७-:* खचलेल्या करूळ घाटाचे काम मंगळवारी पूर्ण झाले असून हा घाटमार्ग सायंकाळपासून वाहतुकीला सुरू करण्यात आला असल्याची माहिती संबंधित विभागाकडून प्राप्त झाली आहे. करुळ घाट वाहतूकीस सुरु होत असल्याने वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. अतीवृष्टीत करूळ घाटाची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. 12 जुलै रोजी घाटातील मोरी नजीकचा अर्धा…

Read More

डॉक्टर ,विद्युत मंडळाचे कर्मचारी यांचा भेटवस्तु व काजुचे कलम देवुन सत्कार

शिवसेना शाखा कट्टामार्फत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित् उपक्रम *💫मालवण दि२७-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित् शिवसेना शाखा कट्टा यांच्या मार्फत करोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या डॉक्टर , विद्युत मंडळाचे कर्मचारी यांचा शाल , भेटवस्तु व काजुचे कलम देवुन सत्कार करण्यात आला. यावेळी कट्टा गुरामवाडी तील शेतकऱ्यांना काजुची…

Read More

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २५ रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी तालुक्यात आज २५ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १४ तर ग्रामीण भागात ११ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read More

पूरग्रस्त प्रती कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,5 किलो तूरडाळ, 5 लिटर केरोसीन मोफत

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *💫सिंधुदुर्गनगरी दि२७-:* अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार झालेल्या प्रती कुटुंबांना 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 5 किलो तूरडाळ आणि 5 लिटर केरोसीन मोफत देण्याची सूचना तहसिलदारांना दिली आहे. बाधित कुटुंबांकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य देण्यात येईल. सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथे एनडीआरएफचे एक पथक कोसळलेल्या दरडीत…

Read More

आडवली मालडी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न

*💫मालवण दि.२७-:* आडवली मालडी जिल्हा परिषद मतदारसंघातआमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. शिवसंपर्क अभियानांतर्गत हिवाळे व रामगड येथे बैठक घेऊन कार्यकर्त्यांना संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आडवली मालडी विभाग प्रमुख पदी बंडू चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर विभाग संघटक पदी संतोष घाडी, व रामगड शाखा प्रमुख पदी रामू सादये…

Read More
You cannot copy content of this page