माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यास मी महाराजांची आणि मावळ्यांची माफी मागेन

मात्र राजकारणातील कावळ्यांची माफी नाही;ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांचा टोला

*⚡सावंतवाडी ता.१०-:* मी कुठेही महाराजांचा एकेरी उल्लेख केला नाही. तरीही बोलता बोलता माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यास मी नतमस्तक होऊन महाराजांची आणि हजारो मावळ्यांची माफी मागेन, मात्र राजकारणातील कावळ्यांची मी कधीही माफी मागणार नाही असा टोला ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी लगावला आहे. लोबो म्हणाल्या, मी बोलताना कुठेही महाराजांचा एकेरी उल्लेख केला नव्हता. मात्र काही लोक पडद्याच्या मागे लपून राजकारण करीत आहेत. अशा लोकांनी हा प्रकार तात्काळ थांबवावा अस आवाहनही लोबो यांनी केले. तरीही बोलता बोलता जर माझ्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख झाला असेल तर मी महाराजांच्या हजारो मावळ्यांसमोर नतमस्तक होऊन माफी मागेन, मात्र राजकारण करणाऱ्यांची माफी कधीही मागणार नाही, असे कणखर मतही लोबो यांनी व्यक्त केले

You cannot copy content of this page