शेर्पे ग्रामपंचायतीचा महावितरणला जोरदार दणका
*⚡कणकवली ता.१०-:* शेर्पे ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या महावितरण कंपनीच्या 208 विद्युत पोलची व 5 डीपीची मिळून आतापर्यंतची थकबाकी रक्कम 34 लाख 33 हजार रुपयांची आकारणी महावितरण कंपनीकडून मिळण्याबाबतचे पत्र शेर्पे ग्रामपंचायतीने उपकार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांना दिले आहे.त्यामुळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये लावण्यात आलेले महावितरणचे विद्युत पोलचे भाडे आता ग्रामपंचायतीने आकारण्यास सुरुवात केली आहे मौजे शेर्पे गावामध्ये विज जोडणी साठी उभारण्यात आलेले इलेक्ट्रिक पोल व डी.पी हे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जागेत उभारले असल्याने व याचा कर ग्रामपंचायतीला मिळायला हवा यासाठी या ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये ठराव करून महावितरण कंपनीला थकित व चालू कर आकारणी केलेली रक्कम येणेबाकी असल्याने ती ग्रामपंचायतीस जमा करणेबाबत पत्र व कर पावती सूर्यवंशी यांना देण्यात आले. यावेळी सरपंच निशा गुरव , उपसरपंच अरूण ब्रह्मदंडे , ग्रामपंचायत सदस्य विजय कांबळे, सुलभा शेलार व माजी उपसरपंच महमद जैतापकर उपस्थित होते.
