*⚡वेंगुर्ला ता.१०-:* महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, वेंगुर्ला व ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ला यांच्या सहकार्याने ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, कॅम्प-वेंगुर्ला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे तपासणी शिबिर ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदेचे विद्यार्थ्यांनी आयोजित केले आहे. या तपासणी शिबिरात डॉ.अतुल मुळे व डॉ.अश्विनी माईणकर हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे व प्रज्ञा परब या उपस्थित राहणार आहेत.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
