दीपावली शो टाईम स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जय हनुमान मित्र मंडळ दांडेलीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.१०-:* जय हनुमान मित्र मंडळ, दांडेली आयोजित भव्य दीपावली शो टाईम स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाचा शुभारंभ दांडेली सरपंच कृष्णा पालयेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य निलेश आरोलकर, डॉक्तर केतन रेडकर, डॉक्तर ऐश्वर्या बर्वे, संजय पांगम, पोलीस पाटील अनंत माणगावकर, सुंदर झोरे ,परीक्षक निरंजन सावंत, नम्रता बागकर, पत्रकार मदन मुरकर तसेच जय हनुमान मित्र मंडळचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांचे सुपारी रोप देऊन स्वागत व कोरोना योद्ध्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी आपले विचार मांडून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रस्तावना व सूत्रसंचालन जुईली पांगम यांनी तर आभार रसिक दळवी यांनी मानले. सोमवारी रात्री दांडेली आरोस गाव मर्यादित व खुल्या गटाच्या डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचप्रमाणे होमिनिस्टर ही स्पर्धा घेण्यात आली. तर मंगळवारी लहान व मोठ्या गटात वेशभूषा स्पर्धा, करा ओके स्पर्धा व मिस दीपावली स्पर्धा पार पडल्या. या सर्व स्पर्धांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

You cannot copy content of this page