45 वर्षांवरील खेळाडूंची मालवणला आयपीएल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

*⚡कणकवली ता.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा हौसी क्रिकेट असोसिएशनच्यावतीने मालवण येथील बोर्डिंग मैदानावर 4 व 5 डिसेंबर कालावधीत 45 वर्षांवरील खेळाडूंची आयपीएलच्या धर्तीवर टेनिस बाल क्रिकेट स्पर्धा आयोजित आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी 13 नोव्हेंबरला दैवेज्ञ हॉल, शिवाजीनगर, कुडाळ येथे सायंकाळी 4 वा. जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ खेळाडू, असोसिएशनच्या सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. तरी सर्वांनी या बैठकीला वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सुनील धुरी (9421261330) या नंबरवर संपर्क साधावा.

You cannot copy content of this page