हळवल परबवादी तिटाई महिला मंडळाने बांधला वनराई बंधारा

*⚡कणकवली ता.१०-:* कणकवली तालुक्यातील तिटाई महिला मंडळ हळवल यांच्यावतीने वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. पावसाळा संपल्यानंतर ग्रामीण भागात पाणी तुडवडा काही प्रमाणात होत असतो यामुळेच असे उपक्रम घेणे गरजेचे असल्याने हळवल येथील तिटाई महिला मंडळाच्यावतीने हळवल परबवादी येथील नाल्यात हा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या वनराई बंधाऱ्यामुळे गावातील गुरांना काही काळ मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. तिटाई महिला मंडळाने स्वखर्चाने बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची पाहणी केल्यानंतर हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया हळवल ग्रामस्थांनी दिली आहे. १ मे २०२० रोजी स्थापना झालेल्या तिटाई महिला मंडळ हळवल यांच्यावतीने अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. हा वनराई बंधारा बांधतेवेळी अध्यक्ष गायत्री गावडे, सान्वी गावडे, सहखजिनदार दर्शना परब, मंगल गावडे, प्रीती गावडे, तेजश्री परब, सविता गावडे, वंदना गावडे, रोहिणी परब, अंकिता परब, संजना धुरी, अर्चना परब, मयुरी पाडावे, स्नेहा गावडे, रुपाली राणे, दिव्या परब, वनिता परब, प्राची मडव, विजया परब, राजश्री परब, सुवर्णा परब सोनल गावडे आदी सदस्य उपस्थित होते.

You cannot copy content of this page