एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्गने दिला पाठिंबा

*⚡कणकवली ता.१०-:* एस टी महमंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी महामंडळ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या त्यांच्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग यांनी पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी हेळसांड व त्यामुळे सुमारे ३६ कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासन या कर्मचाऱ्यांवर अन्याय करत आहे. खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा ही आपली इच्छा असून शासनाने ही मागणी त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे. व ही मागणी मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेईल व यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार राहील असा इशारा या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page