‘जिओ’ प्रश्नावरून सत्ताधारी-विरोधकांत कलगीतुरा

सावंतवाडी नगरपरिषद मासिक सभा

*⚡सावंतवाडी ता.१०-:* ‘जिओ’बाबत नगराध्यक्ष संजू परब यांनी विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवल्याचा आरोप अनारोजिन लोबो यांनी केल्यामुळे आज झालेल्या नगरपरिषद मासिक सभेत लोबो आणि परब यांच्यात चांगलीच कलगीतुरा रंगला. अखेर प्रथम पाणीप्रश्न सोडवू, असे परब यांनी सांगितल्यानंतर या वादावर पडला. सावंतवाडी नगरपरिषदेच्या मासिक सभेत पाणी प्रश्नावर विचारविनिमय सुरु असताना असताना नगराध्यक्ष संजू परब आणि गटनेत्या अनारोजीन लोबो यांच्यामध्ये जिओ प्रश्नावरून जुंपली. नगराध्यक्ष परब यांनी आपल्याला अंधारात ठेवल्याचा आरोप करणाऱ्या लोबो यांना जिओ ठरावाची प्रत पाठवतो, असे परब यांनी सांगितल्याने वातावरण चांगलेच तापले. यावेळी द्विसदस्यीय समितीने जिओचा निर्णय घेतला. याबाबत आम्हाला कल्पना दिली नाही. त्यामुळे या खोदाईला, नागरिकांच्या अपघाताला जबाबदार कोण ? असा सवाल लोबो यांनी केला. तसेच लोकांकडून ‘पाकीट’ घेण्याच्या विषयावरूनही सभेत रणकंदन झाले. अखेर नगराध्यक्ष संजू परब यांनी हस्तक्षेप करत यावर आयत्यावेळी या विषयावर चर्चा करू, आधी पाणी प्रश्नावर बोलू असं सांगून वादावर पडदा टाकला.

You cannot copy content of this page