*⚡मालवण ता.०९-:* चौके येथील जय बजरंगबली मित्रमंडळाच्या वतीने दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता चौके पेट्रोल पंप समोर तिरंगी भजन बारीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये बुवा संदीप लोके (श्री वडची देवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ देवगड) विरुद्ध बुवा गुंडू सावंत (हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ) विरुद्ध बुवा दिनेश वागदेकर (डुंगो कमला प्रासादिक भजन मंडळ शेळपी वेंगुर्ला) यांच्यात सामना रंगणार आहे. तरी भजन प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विनोद सांडव यांनी केले आहे.
चौके येथे तिरंगी भजनबारी सामना
