पुढची २५ वर्षे भाजपचीच सत्ता;आ नितेश राणें यांचे केसरकरांना प्रत्युत्तर
*⚡सावंतवाडी ता.०९-:* नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत सावंतवाडी नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. आमचे विरोधक त्यासाठी पाठपुरावा करतात त्याचा आनंदच आहे. नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक बंद प्रकल्प आम्ही मार्गी लावणार आहोत सिनेमा व नाट्यग्रह बंद असल्यामुळे कंटेनर थेटर सुरू झाले नव्हते. मात्र येत्या डिसेंबर मध्ये आपल्या हक्काच्या थिएटरमध्ये सावंतवाडीकर पहिला सिनेमा पाहतील अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे आले असता दिली. तसेच नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले केवळ एकशे दहा दिवस कशाला पुढील पंचवीस वर्षे सावंतवाडी शहरावर भाजपची सत्ता राहील अशा शब्दांत केसरकर यांना प्रत्युत्तर दिले.
