आमदार नितेश राणे : 36 जणांची आत्महत्या ही सरकारने केलेली हत्याच
*⚡सावंतवाडी ता.०९-:* अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या विलगीकरणा सारख्या प्रश्नी, मदत करण्याची मात्र राज्य शासनाची इच्छाशक्तीच नाही. याउलट त्यांच्यावर कारवाई केली जाते तर अनिल परब यांना शंभर कोटीची वसुली करण्यास वेळ आहे मात्र या लोकांचे पगार काढण्यास वेळ नाही का..? असा सवाल यावेळी नितेश राणे यांनी उपस्थित केला तर 36 जणांची आत्महत्या ही सरकारने केलेली हत्याच आहे. असा आरोपही त्यांनी केला. सावंतवाडी येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलन स्थळी आमदार नितेश राणे यांनी भेट दिली असता ते यावेळी पत्रकारांशी बोलत होते.
