Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळात न.प.च्या कचरा डेपोला भीषण आग…

दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल.. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली आग वाऱ्याने भडकली. आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण कचरा डेपोला वेढा दिला.आगीची माहीती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत व एमआयडीसीचे अग्नीशमन बंब घटनास्थळी पाचारण…

Read Full News

रेडी हुडावाडी येथील लोखंडी विद्युत पोल पडण्याच्या स्थितीत…

⚡वेंगुर्ले ता.१५-: रेडी हुडावाडी (तालुका वेंगुर्ले ) येथील श्री देव सत्यपुरुष मंदिराजवळील रस्त्याच्या बाजूलाच वळणावर धोकादायक स्थितीत लोखंडी विद्युत पोल असून तो पूर्णतः गंजून गेला आहे त्यामुळे तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे.यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते.भर वस्तीत आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच असलेला हा धोकादायक पोल पूर्णतः गंजून गेला असून तो पडण्याच्या स्थितीत आहे.या रस्त्यावरून…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला रस्ते सुरक्षा समितीचा आढावा…

⚡सिंधुर्दुर्गनगरी ता.१५-: जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यांवर वेग मर्यादा कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य पातळीवरील यंत्रणेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच कुडाळसह इतर शहरांमध्ये बायपास मार्ग निश्चित करून अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठीही वाहतूक विभागाने प्रस्ताव सादर करावेत, असे त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.या बैठकीत अपघातांचा सविस्तर…

Read Full News

विमानतळाच्या धर्तीवर सावंतवाडी एसटी स्थानक उभारणार…

आमदार दीपक केसरकर:दोन महिन्यांत आराखडा तयार करणार,.. ⚡​सावंतवाडी ता.१५-:येथील रेंगाळलेले एसटी बस स्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी येत्या दोन महिन्यात आराखडा तयार करून टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे एसटी स्टँड असल्याने ते विमानतळाच्या धरतीवर अद्यावत असे असणार आहे पुढील दोन वर्षात हे स्टॅन्ड उभारण्यासाठी प्रयत्न राहणार…

Read Full News

शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा हा कोकणावर अन्याय करणारा…

पर्यटक व व्यापार वाढीसाठी सुधारित मार्गाची मुख्यमंत्र्यांना केले निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा नवीन आराखडा हा कोकणासह विशेषतः सिंधुदुर्गावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडताना त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा अशी आपली मागणी असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे अशी माहिती माजी मंत्री, आमदार दीपक…

Read Full News

तीर्था कोचरेकरचे नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड मध्ये यश…

कुडाळच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची विद्यार्थीनी.. कुडाळ : येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलने नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड (ITO) मध्ये पुन्हा एकदा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गेल्यावर्षी प्रशालेमध्ये संपन्न झालेल्या इयत्ता १ ली ते ७ वी मधील एकूण ६४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्साहाने सहभाग घेतला होता त्यापैकी इयत्ता सातवी मधील…

Read Full News

देवगडप्रमाणे वेंगुर्ला शहराचा पर्यटन विकास करावयाचा आहे…

ना. नितेश राणे ;दिलीप गिरप यांनीशहर विकासासाठी आणखी संकल्पना राबवाव्यात.. ⚡वेंगुर्ला ता.१५-: ज्या प्रमाणे देवगडचा पर्यटन विकास केला आहे त्याचप्रमाणेच वेंगुर्ला शहरात नमो गार्डन प्रकल्पामुळे शहराचा व ग्रामीण भागाचा निश्चितच अधिकचा विकास होऊन निश्चितच पर्यटनात वाढ होईल. त्यासाठी दर्जेदार गार्डन साकारून शासनाचे 5 कोटीचे बक्षीस मिळविण्यास पात्र व्हा, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा…

Read Full News

मदर क्वीन इंग्लिश स्कूलमध्ये पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचा शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.१५-: मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे फिटनेस योग अकॅडमी , सिंधुदुर्ग यांच्या मार्फत बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचे उदघाटन करण्यात आले . यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापक सौ अनुजा साळगावकर, फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग अकॅडमीचे कोषाध्यक्ष रवींद्र…

Read Full News

आंबोली घाटातून येणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करा…

सागर ढोकरे यांची मागणी: संबंधित पोलिसांनी त्वरित दखल घ्यावी.. ⚡सावंतवाडी ता.१५: मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले असून घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करून नंतरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी केली आहे. काही दिवसांनी वर्षा…

Read Full News

रेडी गणपतीचा ५० वा वर्धापन दिन १८ एप्रिल रोजी…

⚡वेंगुर्ले ता.१५-: रेडी ( तालुका वेंगुर्ले) येथील प्रसिद्ध गणपतीचा ५० वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्ताने श्री सत्यविनायक महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ६.०० वा. अभिषेक,सकाळी : ८.०० वा. श्री सत्यविनायक महापुजा ,दुपारी : १२.३० वा.महाआरती,दुपारी : १२.४५ वा. तिर्थप्रसाद. दुपारी : १.०० ते…

Read Full News

You cannot copy content of this page