कुडाळात न.प.च्या कचरा डेपोला भीषण आग…

दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल..

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोला आज बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. भर दुपारच्या वेळेस लागलेली आग वाऱ्याने भडकली. आगीने रौद्र रूप धारण करीत संपूर्ण कचरा डेपोला वेढा दिला.
आगीची माहीती मिळताच नगरपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायत व एमआयडीसीचे अग्नीशमन बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेवक निलेश परब, नगरसेविका संध्या तेरसे, श्रेया गवंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

You cannot copy content of this page