⚡वेंगुर्ले ता.१५-: रेडी हुडावाडी (तालुका वेंगुर्ले ) येथील श्री देव सत्यपुरुष मंदिराजवळील रस्त्याच्या बाजूलाच वळणावर धोकादायक स्थितीत लोखंडी विद्युत पोल असून तो पूर्णतः गंजून गेला आहे त्यामुळे तो कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे.
यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते.
भर वस्तीत आणि रस्त्याच्या अगदी बाजूलाच असलेला हा धोकादायक पोल पूर्णतः गंजून गेला असून तो पडण्याच्या स्थितीत आहे.
या रस्त्यावरून बऱ्याच पर्यटकांची सतत ये- जा असते.त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ सदरील पोल बदलून पुढील होणारा अनर्थ टाळावा अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.
रेडी हुडावाडी येथील लोखंडी विद्युत पोल पडण्याच्या स्थितीत…
