आमदार दीपक केसरकर:दोन महिन्यांत आराखडा तयार करणार,..
⚡सावंतवाडी ता.१५-:
येथील रेंगाळलेले एसटी बस स्थानकांचे काम बीओटी तत्त्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी येत्या दोन महिन्यात आराखडा तयार करून टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे एसटी स्टँड असल्याने ते विमानतळाच्या धरतीवर अद्यावत असे असणार आहे पुढील दोन वर्षात हे स्टॅन्ड उभारण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज दिली.
श्री केसरकर यांनी आज एसटी बस चालक परिसराची पाहणी केली यावेळी या बसस्थानाचा आराखडा तयार करणारे हापीस कॉन्ट्रॅक्टर यांचे जवळचे हुजेफा भोल, एसटीचे विभागीय अभियंता अक्षय केंकरे, नगरपालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर, पालिकेचे बांधकाम अभियंता तुषार सरडे, आगार व्यवस्थापक निलेश गावित आधी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना की सरकार म्हणाले, कोरोना काळात सावंतवाडी एसटी डेपोचे नव्याने सुरू करण्यात आलेले काम रेंगाळले होते पुढे ते काम होऊ न शकल्याने हा विषय आपण राज्याचे परिवहन मंत्री यांच्या कानावर घालून हे एसटी स्टँड बीओटी तत्त्वावर अद्यावत असे उभारण्यात यावे अशी मागणी केली होती एकूणच या मागणीनुसार या बस स्थानकाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे येथे दोन महिन्यात हा आराखडा तयार करून बस स्थानकात च्या नवीन कामाचे टेंडर निघणार आहे त्यानंतर पुढील दोन वर्षात हे बस स्थानक कसे उभे राहील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे मात्र बस स्थानक अद्यावत असे उभारत असताना कोणीही विस्थापित होता कामा नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत. तसेच वेंगुर्ला बस स्थानक आणि सावंतवाडी बस स्थानक यांच्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचा अडथळा निर्माण होत आहे मात्र हा दवाखाना दुसरीकडे हलवण्यासंदर्भात बोलणे सुरू आहे लवकरच याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी पॅन्ट हे मोठे असल्याने विमानतळाच्या धर्तीवर याचा कायापालट केला जाणार आहे.
श्री केसरकर पुढे म्हणाले बस स्थानकाचा जुना आराखडा बदलण्यात येणार आहे या आराखड्यानुसार उभारण्यात आलेले डेपोची इमारत तसेच ठेवून अन्य ठिकाणी नव्या आराखड्यानुसार काम होणार आहे एकूण शंभर वर्षाचा करार करण्यात येणार असून साधारण चार एकर मध्ये हे बस स्थानक उभे राहणार आहे यामध्ये चार्जिंग स्टेशन तसेच अन्य विविध गोष्टी समाविष्ट आहेत तसेच कमर्शियल बाबींचा विचार करता त्या ठिकाणी दुकान गाळे सुद्धा समाविष्ट आहेत. बस स्थानकासोबतच मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर आपला विशेष भर असल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये सामान्य जनतेला आणि मतदारांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे.
चौकट
सावंतवाडी बस स्थानक आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ही दोन कामे माझ्या मतदारसंघांमध्ये विशेषतः सावंतवाडी शहरातील रेंगाळले होते यातील मल्टीस्पेशालिटी प्रश्न सोडवण्यासाठी आपण लवकरच बैठक घेऊन मार्ग काढणार आहे. तर बस स्थानकाचे काम सुद्धा पुढील दोन वर्षात मार्गे लावण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
