समाज साहित्य संमेलन अध्यक्षपदी लेखक राजन गवस तर प्रवीण बांदेकर प्रमुख पाहुणे
18 डिसेंबर रोजी सावंतवाडीत आयोजन *⚡कणकवली ता.०८-:* सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे साहित्य संमेलन शनिवार 18 डिसेंबर रोजी सायं. 5.30 वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. डॉ.राजन गवस ( गारगोटी ) यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे….
