प.पू. भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाला श्रोत्यांचा प्रतिसाद

*⚡कणकवली ता.०८-:* योगीयांचे योगी प.पू. भालचंद्र महाराज यांचा 44 वा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.सकाळी पहाटे समधीपूजन आणि काकड आरतीने झाली.त्यानंतर भालचंद्र महारुद्र माहभिषेक अनुष्ठान पीयूरोहिताच्या मंत्रोपच्चाराने पार पडला.तद्नंतर दुपारी भाविकांनी बाबांच्या समाधीस्थळी नतमस्त होत दर्शन घेतले.दर्शनासाठी मोठी रांग लागली होती.पुण्यतिथी महोत्सवामुळे शहरात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी दर्शनासाठी विविध ठिकाणाहून कणकवलीत भक्त दाखल झाले आहेत.दुपारी आरती झाल्यानंतर तीर्थप्रासादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला. दुपारी 1 ते 4 या वेळेत विविध भजनी मंडळांनी सुश्राव्य भजने सादर करत आपली सेवा भालचंद्र महाराज यांच्या चरणी लीन केली.भजनी कलाकारांनी सादर केलेल्या भजनाने भाविक देखील मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी 4 वा.कीर्तन महोत्सवात ह.भ.प.चारुदत्त आफळे यांनी संत नामदेव महाराज यांच्या चरित्रावर कीर्तन सादर केले.या कीर्तनातून त्यांनी संत नामदेव माहराज यांचा जीवनपट भाविकासमोर उलगडला.तसेच कीर्तनाच्या माध्यमातुन प्रबोधन केले.या कीर्तन महोत्सवाला देखील रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद देत या कीर्तनाचा आनंद लुटला. रात्रौ बाबांच्या दैनंदिन आरतीने दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.या महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात ही रंगबिरंगी फुलांची आरास तसेच विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.पुढील 3 दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे भाविक भक्त न्हाऊन निघणार आहेत.या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page