भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांची मागणी;पोलिसाना दिले निवेदन
सावंतवाडी,ता.०८: शहरात ‘धूमस्टाईल’ चालकांचा सुळसुळाट वाढला असून अशा भरधाव वेगाने गाड्या हाकणार्या दुचाकी चालकांना रोखा, अशी मागणी आज सावंतवाडी शहर भाजपाच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिसांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी ठाणे अमंलदार राजलक्ष्मी राणे यांना दिले आहे. यात असे नमुद करण्यात आले आहे की, शहरात काही नागरीक व महाविद्यालयीन विद्यार्थी बेदकारपणे वाहने चालवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. काल येथील महाविद्यालयाकडे झालेला अपघात लक्षात घेता त्यांची तीव्रता दिसून येते. त्यामुळे याची तात्काळ दखल घेवून वेगाने गाड्या चालविणार्यांवर दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी बंटी पुरोहीत, सत्या बांदेकर आदी उपस्थित होते.
