कमळ चिखलात उगवते हे सांगावे लागते का?

संजू परब यांचा पलटवार;पुंडलिक दळवी राजकारणात अजून लहान असल्याची टीका

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवीं हे राजकारणात नवीन असून त्यांचे राजकीय वय १ वर्ष आहे. ‘कमळ’ चिखलातच उगवते हेदेखील त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देणं संयुक्तिक नाही, असं सांगत नगराध्यक्ष संजू परब यांनी पलटवार केला.

तर शहरात लोकांच्या विहिरीत पण कमळ उगवलीत. शहरात फेरफटका मारल्यास ती दिसतील, अन्यथा आम्ही दाखवतो असं मत नगरसेवक आनंद नेवगी यांनी व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, अमित परब, सत्या बांदेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page