दोडामार्गात ‘रणांगण’चा भव्यदिव्य नाट्यप्रयोग

गोविंद महाले आणि नाट्यप्रेमींची संकल्पना;पेशवेकालीन इतिहास येणार भेटीला-:ग्रामीण भागातील कलाकारांना मिळणार संधी

*⚡दोडामार्ग ता.०८ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात “रणांगण” हा भव्यदिव्य नाट्यप्रयोग होणार असून गोविंद महाले व नाट्यप्रेमी सावंतवाडा यांच्या संकल्पनेतूत हे महानाट्य होणार आहे.महानाट्याचा प्रयोग ५० ते ६० कलाकारांसह होणार आहे तर पेशवेकालीन इतिहास प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ग्रामीण भागातील कलाकारांना हे व्यासपीठ मिळणार आहे.१९ डिसेंबर सकाळी ११ वाजल्यापासून ऑडिशन सुरू होणार आहे .महानाट्याच्या ऑडिशनसाठी सागर नाईक, 9561464230, गौतम महाले 7030889289 किरण काळबेकर 9823979493 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी नाट्यकर्मी गोविंद महाले, गौतम महाले,सागर नाईक, किरण काळबेकर, वैभव नाईक, निखिल नाईक उपस्थित होते.

You cannot copy content of this page