दुरंगी, तिरंगी लढती होणार
कुडाळ येथील नगरपंचायत निवडणूकीत १७ जागांसाठी ५८ जणांनी ६२ उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. आज अर्ज भरलेल्या उमेदवारांमध्ये ज्योती दळवी, अनुजा राऊळ, सोनल सावंत, प्रवीण राऊळ ,शुभांगी काळसेकर, भूषण कुडाळकर, मयूर शारबिद्रे,आफ्रीन करोल,प्रांजल कुडाळकर, सिद्धार्थ कुडाळकर,विमल राऊळ, मंदार शिरसाट, तेजस्वी परब,देविका बांदेकर, रंजना दळवी, पूजा पेडणेकर,प्रशांत राणे, प्रज्ञा राणे, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, प्राजक्ता बांदेकर,सुधीर चव्हाण, रीना पडते, अभिषेक गावडे ,रेवती राणे, सखु आकेरकर, वैशाली बावकर, नयना मांजरेकर, अश्विनी परब, विलास कुडाळकर, अनुप जाधव, रुक्सार शेख,राजीव कुडाळकर,संध्या तेरसे, अरुण गिरकर, केतन पडते, योगेश राऊळ ,सुनील भोगटे, कृष्णा मेस्त्री, रेखा कांणेकर,आदिती सावंत, वैशाली बावकर, रोहन काणेकर, गणेश भोगटे, मुण्मयी धुरी, सुनील बांदेकर, रमाकांत नाईक, साक्षी सावंत, शिल्पा घुर्ये तेजस्विनी वैद्य अशी ५२ जणांची नावे आहेत. याबाबतची माहिती कुडाळचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र मठपती यांच्याकडून देण्यात आली
