दोडामार्गात ५१ उमेदवारी अर्ज

भाजप १६, शिवसेना ९, राष्ट्रवादी ८, काँग्रेस ८ व अपक्ष १० अर्जाचा समावेश

*दोडामार्ग / सुमित दळवी* कसई दोडामार्ग नगरपंचायती साठी सर्व पक्ष मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४८ अर्ज दाखल झाले. अर्थातच नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ५१ जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

यामध्ये भाजपाकडून १६, शिवसेना ९, राष्ट्रवादी ८, काँग्रेस ८, अपक्ष १० आदींचा समावेश आहे. त्यामुळे दोडामार्गमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात चुरशीची खरी लढत होणार असल्याचे चित्र असून काँग्रेस ८ प्रभागांत उमेदवारी अर्ज दाखल करून आघाडी व भाजपची काही प्रभागात डोकेदुखी केली आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याचे गेले सहा दिवस लांब असलेले इच्छुक उमेदवार मंगळवारी एकाच वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल झाले आणि ४८ अर्ज दाखल केले. आज एकूण ५१ उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे.

You cannot copy content of this page