Global Maharashtra Breaking News

जिल्हा परिषदेची पर्यावरण पूरक गणेशोत्सव स्पर्धा

विजेत्या ग्रामपंचायतला लाखाचे बक्षीस अध्यक्षा संजना सावंत, सीईओ नायर यांची माहिती *⚡ओरोस ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला हागणदारी मुक्त अधिक (ODF+) होण्याकरीता, तसेच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, जलजिवन मिशन, पर्यावरण पुरक गणेशोत्सव या उपक्रमांना ग्रामपंचायत स्तरावर गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन जिल्हास्तरीय स्वच्छ, पर्यावरण पुरक गणेशोत्सव स्पर्धा 2021-2022 आयोजित करण्यात आली आहे. …

Read More

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा मोलाचा असतो:प्रा.रुपेश पाटील

*⚡कणकवली ता.०६-:* शिक्षक हा समाजाचा खऱ्याअर्थाने अभियंता असतो. संस्कृती रक्षण व संवर्धनाचे कार्य अव्याहतपणे शिक्षक पार पडतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेने शिक्षण, आरोग्य, पर्यावरण रक्षण, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय सेवेचे संस्कार,रोजगार निर्मिती मूल्य संस्कार, सामाजिक समस्यांचे निवारण करण्यासाठी लेखन व संशोधन त्याचबरोबर युवा देशाला घडवणारे,तसेच संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे काम शिक्षक सातत्याने पार पडतात. ज्या देशात शिक्षकांचा सन्मान होतो…

Read More

वेंगुर्ला शिवसेना शाखेमध्ये माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* येथील शिवसेना शाखेमध्ये आज ६ सप्टेंबर रोजी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुका प्रमुख बाळु परब, उपजिल्हा प्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका अस्मिता राऊळ, आनंद बटा, डेलीन डिसोजा, दिलीप राणे, राहुल नरसाळे, शंकर कुडव आदी…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४८ हजार २४० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ४५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

सविता आश्रमच्या वतीने मालवण समुद्र किनारी स्वच्छता मोहीम

*⚡मालवण ता.०६-:* पणदूर येथील सविता आश्रमच्या वतीने मालवण मच्छीबाजार ते दांडी किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत सविता आश्रममधील अनाथ मुले, पदाधिकारी, सहकारी, कर्मचारी यांनी सहभाग घेतला. पणदूर येथील जीवन आनंद संचलित सविता आश्रम लोकाश्रयावर चालविला जातो. आश्रमासाठी विविध स्तरातून मदत प्राप्त होत असते, म्हणून आपणही समाजाला काही देणे लागत आहोत या हेतूने…

Read More

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेश शाळांमध्ये लगबग

गणेशभक्तांची घरोघरी गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु *⚡सावंतवाडी ता.०६-:* ‘विघ्नहर्त्या गणपतीचे आगमन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश शाळांमध्ये लगबग वाढली असून गणेश मूर्ती रंगकामात सर्वच शाळातील मूर्तिकार गुंतले आहेत. विघ्न कितीही मोठे असले तरी ‘विघ्नहर्त्याचे पूजन हे होणारच अशा भावनेने गणेशभक्तांनीही घरोघरी गणपतीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु केली आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा…

Read More

स्थानिक व्यापाऱ्यांना डावलून धनदांडग्यांना गाळे देण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना गप्प बसणार नाही

उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे यांचा इशारा वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषद मच्छिमार्केटची जूनी इमारत पाडताना त्यामध्ये असलेल्या गाळेधारकांना पुन्हा त्याच ठिकाणी गाळे देण्याचे ठरले होते. तसा ठरावही करण्यात आला होता. मात्र आज या ठरावाची पायमल्ली करण्यात येत आहे. जुन्या गाळेधारकांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक व्यापा-यांना डावलून धनदांडग्यांना गाळे देण्याचा प्रयत्न केला गेल्यास शिवसेना…

Read More

भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी नारायण राणे यांची दिल्ली येथे घेतली भेट

जन आशीर्वाद यात्रेच्या व्हिडीओचे नारायण राणे यांच्या हस्ते प्रकाशन;कोंबड्यांची वेंकीज कंपनी सिंधुदुर्ग आणण्यासाठी प्रयत्न सुरू *⚡कुडाळ ता.०६- :* भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिल्लीत येथे जात नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी कोकणातील यशस्वी जन आशीर्वाद यात्रेच्या व्हिडीओचे प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. कोंबड्यांची वेंकीज कंपनी सिंधुदुर्ग आणण्यासाठी विशाल परब स्वतः मैदानात…

Read More

कोणालाही कितीही ताकद पुरविली तरीही शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही- आ. वैभव नाईक

*भाजपचे असगणी सरपंच व भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश;आडवली-मालडी मतदारसंघात असगणीत भाजपला खिंडार *⚡कणकवली ता.०६-:* शिवसेना संपविण्याच्या अनेक वेळा वल्गना करण्यात आल्या. शिवसेना संपविण्यासाठी अनेकांना ताकद देण्यात आली. परंतु शिवसेना कधीच थांबली नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे संपूर्ण महाराष्ट्रात चांगले काम सुरु आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोणाला मंत्री पद दिले, शिवसेनेच्या…

Read More

काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे बुधवारी उद्घाटन

*⚡सावंतवाडी ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० होणार असून, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्या हस्ते होणार आहे.

Read More
You cannot copy content of this page