*⚡सावंतवाडी ता.२८-:* राष्ट्रीय काँग्रेसचा १३६ वा वर्धापन दिन आज सावंतवाडी येथील जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या संपर्क कार्यालय येथे काँग्रेसच्या झेंड्याची ध्वजारोहण पालकर चे जिल्हा चिटणीस मोहिम शेख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळा गावडे, महिला जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी , जेष्ठ नेते अँड.दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसूरकर , ओबीसी प्रदेश सरचिटणीस सौ. हमीदी मेस्त्री, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर वंजारी, सच्चिदानंद बुगडे , शहराध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर, सावंतवाडी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती वागळे, सरचिटणीस रूपेश आईर, तालुका सेवादल संजय लाड, तसेच राजू धारपवार, अस्लम खतीब, बबलू डिसोझा, पाँल फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात जिलबी वाटून साजरा करण्यात आला.
