भूतनाथ नूतन नाट्य समाज मंडळाचा अमृतमहोत्सव साजरा

*⚡मालवण ता.२८-:* वायरी भूतनाथ येथील भूतनाथ नूतन नाट्य समाज या नाट्यमंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या महोत्सवात विविध नाट्यप्रयोग व दीर्घांक सादर झाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. रात्री १० वा. भूतनाथ नूतन नाट्यसमाज वायरी भूतनाथ यांचे दोन अंकी सामाजिक नाटक ‘आई शिवाय घर नाही’, सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ कवठी, कुडाळ यांचे दोन अंकी नाटक ‘झिलग्यांची खोली’, साई कलामंच निर्मित दोन अंकी नाटक ‘बाकी शून्य’, श्री रामेश्वर प्रॉडक्शन निर्मित दोन अंकी नाटक ‘वडाची साल पिंपळाक’ अर्थात ‘सुनबाई तोऱ्यात’ घुमडे व केळूस येथील महिलांचा फुगडी कार्यक्रम ‘मी भारतीय’ दीर्घांक रवींद्र देवधर व अक्षय सातार्डेकर यांनी सादर केला.

दि. २३ रोजी सत्यनारायणाची महापूजा पार पडली. रात्री ९.३० वाजता महोत्सवाचे अध्यक्ष वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, ज्येष्ठ पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक, सिंधुरत्न व भजन सम्राट भालचंद्र केळुसकर, बुवा रवींद्र देवधर, रवींद्र वराडकर, प्रदीप वेंगुर्लेकर, सुदेश मयेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अभिनेत्री सुजाता शेलटकर, बंटी टिकम, तन्वी वेंगुर्लेकर, योगिता सावंत, पप्या कद्रेकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रंगमंचावर सादर केलेल्या नाट्यसंस्था व फुगडी, दशावतारी नाटक, भजने झालेल्या बुवांचे सत्कार करण्यात आले. कलांकुर ग्रुप, अष्टपैलू ग्रुप, स्वराध्या फाऊंडेशन मालवण, श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ, गवंडीवाडा, नवकलाकार नाट्यमंडळ तारकर्ली, ज्येष्ठ दशावतारी कलावंत जी. जी. चोडणेकर यांचेही सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. रात्री १२ वाजता दत्त माऊली दशावतारी नाट्यमंडळ दाभोली ता. वेंगुर्ला यांचा ‘स्वामी अन्नपूर्णा’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नाट्य रसिकांनी नाट्यप्रयोगांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

You cannot copy content of this page