Headlines

कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा

*⚡मालवण ता.२८-:* थोर गणिततज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिना निमित्त साजरा होणारा राष्ट्रीय गणित दिन कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नरडवे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा वसुंधरा विज्ञान केंद्राचे तज्ञ मार्गदर्शक श्री. के.एम. पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि दोनशे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून उत्साहात संपन्न झाला.

गणितीय परिपाठ, गणित गीत, अंकांच्या किमयेतून गणेश दर्शन, गणितज्ञांची माहिती, गणितीय कोडे, जादूचे प्रयोग ,चिन्हांकित संख्यांवरील क्रिया यावर आधारित गीत, कथा गणिताची-शून्यापासून अनंता पर्यंतच्या इतिहासाची, गणितीय उखाणे ,गणितीय चित्रकला स्पर्धा, गणितीय रांगोळी प्रदर्शन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमास कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर उर्फ बापू वराडकर, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे मुख्याध्यापक एन.के.कांबळे, वराडकर इंग्लिश मिडियम स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. शिरोडकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये भौमितिक आकाश कंदील स्पर्धेतील विजेत्यांचा तसेच गणित संबोध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, गणित उत्सव रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एम जी टी फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी, राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी प्रतीक्षा नीळकंठ मेस्त्री, मार्गदर्शक शिक्षक समीर चांदरकर इत्यादी स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम गणित शिक्षक संजय नाईक, महेश भाट, प्रकाश कानूरकर, सौ.वीणा शिरोडकर, सौ.सिमरन चांदरकर, भूषण गावडे यांच्या कल्पक मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी रामकृष्ण सावंत ,विद्यार्थी हर्ष तांबट, कला शिक्षक समीर चांदरकर कुमारी कादंबरी वालावलकर यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page