*⚡मालवण ता.२८-:* कोळंब येथील महापुरुष पार येथे दि. १ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ८.३० वा. लघुरुद्र, दुपारी १२.३० वा. महाआरती, १.३० पासून महाप्रसाद, ४ वा. हळदीकुंकू, सत्यनारायण महापूजा, तिर्थप्रसाद, रात्री भजने होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कोळंब महापुरुष पार देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.
कोळंब महापुरुष पार येथे १ रोजी कार्यक्रम
