*⚡मालवण ता.२८-:* मालवण तालुक्यातील महान गावातील काही ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वतीने गावात सुरू असलेल्या विकासकामांना प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करत असल्याची माहिती प्रवेशकर्त्यांनी दिली. शिवसेना मालवण शाखा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, बाळू नाटेकर, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर यासह महान सरपंच सिताबाई महानकर, युवासेना विभाग प्रमुख शशांक माने, राहुल सावंत, महिला संघटक मानसी ठाकूर, महिला आघाडीच्या हिमाली शिंदे, शाखाप्रमुख दामोदर घाडी, दीपक परब, संजय हळवे, युवासेना शाखा प्रमुख विनोद गावडे, जयेश गावडे, उपशाखा प्रमुख हेमंत शिंदे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदीप शिंदे, प्रकाश शिंदे, शरद गावडे, संदीप गावडे, शंकर गावडे यासह अन्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. युवासेना विभागप्रमुख शशांक माने, राहुल सावंत व सहकारी यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाला.
महान येथील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश
