दांडी येथील दांडेश्वराचा ९ रोजी जत्रोत्सव

मालवण: (प्रतिनिधी) मालवण दांडी येथील देव दांडेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव दि. ९ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सकाळी ८ वा. देव दांडेश्वराच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक, ११ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ११ वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन गाव कमिटी व वर्सलकार मोरेश्वर बालगोपाळ मंडळ, दांडी मालवण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page