अतिरिक्त जिल्हाधिकारी बर्गे यांनी स्वीकारला पदभार

सिंधुदुर्गनगरी ता २८-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून शंकर बर्गे यांनी आज पदभार स्वीकारला आहे ,निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी त्यांचे स्वागत केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी गेली तिन वर्षे कार्यरत असलेले मंगेश जोशी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेचा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. हिंगोली येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले शंकर बर्गे यांची सिंधुदुर्गचे नवे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली होती आज सकाळी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला .सहकुटुंब सिंधुदुर्गात दाखल झालेले शंकर बर्गे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते त्यानंतर त्यांची बदली रत्नागिरी एमआयडीसी येथे झाली होती. त्यांना गेल्या तीन वर्षांपूर्वी शासनाने हिंगोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली होती. त्यानंतर आता शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त झालेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर शंकर बर्गे यांची नियुक्ती केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड व जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यानी त्यांचे स्वागत केले .आज शंकर बर्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महसूल कर्मचारी संघटना व विविध संघटनांनी त्यांची भेट घेऊन स्वागत व शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page