Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.०८-:* वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १० ते १९ सप्टेंबर २०२१ कालावधीत शहर मर्यादित ‘इको फ्रेंडली गणेश उत्सव‘ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश मूर्ती ही संपूर्ण मातीची इको फ्रेंडली असावी, सजावटीमध्ये थर्मकॉल, पीओपी, प्लास्टिक साहित्यांचा वापरा न करता फक्त नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा, पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेबाबतचे, टाकाऊ वस्तूंचे पुनर्वापर आदी विषयांवरील सजावटींला अधिक प्राधान्य देण्यात येणार…

Read More

संगणक लॅबचा उपयोक करुन प्राविण्य मिळवावे – नगराध्यक्ष गिरप

*⚡वेंगुर्ला ता.०८-:* व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सन १९७४ ते ७६ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी १० संगणक संच महाविद्यालयाला भेट स्वरुपात दिले. मिळालेल्या संगणकांची एक लॅब बनविण्यात आली असून याचे उद्धाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. या संगणक लॅबचा विद्यार्थ्यांनी पुरेपुर उपयोग करुन प्राविण्य मिळवावे आणि भविष्यात महाविद्यालयासाठी असा आदर्श…

Read More

खारेपाटण चेकपोस्टवर मोफत चहा-पाणी

सुकांत वरूनकर यांची सामाजिक बांधिलकी *⚡कणकवली ता.०८-:* कोकणात येणाऱ्या विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांसाठी खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते सुकांत वरूनकर यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील खारेपाटण चेकपोस्ट येथील मोफत चहा व पाणी वाटपाचा शुभारंभ कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याहस्ते फित कापुन करण्यात आला. या कार्यक्रमाला जि. प. अध्यक्षा संजना…

Read More

कुरंगवणे वरचीगोसावीवाडी येथे नळपाईप लाईन कामाचा शुभारंभ

*⚡कणकवली ता.०८-:* कणकवली तालुक्यातील कुरंगावणे या गावातील वरची गोसावीवाडी येथे नळ पाईप लाईन कामाचा शुभारंभ नुकताच जि प स्थायी समितीचे अध्यक्ष व माजी बांधकाम वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला कुरंगावणे गावच्या सरपंच सरिता पवार,उपसरपंच पप्पू ब्रम्हदंडे,…

Read More

मालवण नगरपालिकेच्या व्यायामशाळेसाठी नगरविकास विभागातर्फे २५ लाखाचा निधी

आमदार वैभव नाईक यांनी केली वचनपूर्ती:महेश कांदळगावकर *⚡मालवण ता.०७-:* मालवण शहरातील नगरपालिकेच्या व्यायामशाळेला अत्याधुनिक साहित्य मिळावे यासाठी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर आमदार नाईक यांनी वचनपूर्ती करत नगरविकास विभागाच्यावतीने २५ लाख रुपयांचा निधी नगरपालिकेस उपलब्ध करून दिला आहे. याबाबतची माहिती मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली मालवण नगरपालिकेच्या ग्रामीण…

Read More

आंबा काजू पीक विमा योजनेचा विमा बागायतदारांना त्वरित मिळावा

कॉग्रेस नेते नंदकुमार घाटे यांची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी देवगड (प्रतिनिधी) आंबा काजू पीक विमा योजनेचा विमा बागायतदारांना त्वरित मिळावा .अशी मागणी देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार घाटे यानी लेखी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांचेकडे केली आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे देवगड तालुक्यामधील सन २०२०-२१ मध्ये येथील बागायतदारांनी आंबा व काजूचा विमा…

Read More

मोंड साईनगर येथून १४ हजार रूपयांचा गोवा बनावटीचा मुद्देमाल जप्त

देवगड तालुक्यातील मोंड साईनगर येथे स्थानिक गुन्हे अन्वेक्षण शाखा सिंधुदुर्ग यांनी केलेल्या कारवाईत गोवा बनावटीचा १४ हजार १००/-रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .सदरची कारवाई मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास करण्यात आली याबाबत रवी मनोहर इंगळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी हिरकांत परशुराम जोशी र.मोंड साईनगर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(इ) नुसार कारवाई करण्यात आली ….

Read More

बेपत्ता नम्रता शिंदे मृतदेह मिळाला

तिर्लोट आंबेरी खादीपात्रात आला आढळून वैभववाडी प्रतिनिधी नापणे जैतापकरवाडी येथील नम्रता नरेंद्र शिंदे वय ४० या बेपत्ता विवाहीत महीलेचा मृतदेह विजयदुर्ग खाडीत तिर्लोट आंबेरी येथील पुलाखाली मंगळवारी सकाळी १०.वाजण्याच्या सुमारास सापडला आहे.मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत नम्रता शिंदे ही ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी कोणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाली…

Read More

सर्व्हे केलेल्या ग्रामीण घरांना आवास योजनेत वगळले

उपसभापती राजू परुळेकर यांचा आरोप मालवण, दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील ज्या ग्रामस्थांची मातीची भिंत व नळ्यांची घरे होती अशा सुमारे ३३४५ ग्रामस्थांचा नवीन घरासाठी सर्वे करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात यात शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या यादीतून अनेकांना डावलण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप मालवण पंचायत समितीचे उपसभापती राजू परुळेकर यांनी पंचायत समितीच्या आढावा सभेत केला….

Read More

देवबाग उपसरपंच पदी मोरेश्वर धुरी यांची बिनविरोध निवड

मालवण, दि प्रतिनिधी देवबाग ग्रामपंचायतीचे उपसरपंच तमास फर्नांडिस यांच्या निधनाने रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी आज देवबाग ग्रामपंचायतीच्या सभेत निवड प्रकिया पार पडून श्री. मोरेश्वर धुरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच जान्हवी खोबरेकर यांच्या अध्यक्षते खाली आज उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,…

Read More
You cannot copy content of this page