*⚡कणकवली ता.३१-:* संत रोहिदास सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्य ही सेवाभावी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून संस्थेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. रोहिदास समाजबांधव आणि जनतेच्या मागणीची दखल संस्थेने घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क कार्यालय कसाल बालमवाडी येथे स्थापन करण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन शनिवार १ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांच्या शुभहस्ते तर संस्थापक राज्यसचिव प्रसाद मसुरकर स, खजिनदार रवींद्र पावसकर, उपाधक्ष्य पंढरी जाधव, कोकण विभाग अध्यक्ष आणि संचालक प्रा. भिकाजी नेरकर, सहसचिव युवराज पोवार, संचालक देवेंद्र कसालकर, अमित चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहिदास समाजाचे ज्येष्ठ अभ्यासक आणि नेते अनंत ओटवणेकर असणार आहेत. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूर येथील संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवीन पदाधिकारी निवड, तसेच शासकीय विविध योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच संत रोहिदास चरित्राचे गाढे अभ्यासक पी बी चव्हाण साहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाजबांधव आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष डॉ प्रदिप बांबरडेकर आणि सचिव अंकुश किंजवडेकर यांनी केले आहे
