सिंधुदुर्ग जिल्हा बँक विजयाचा दोडामार्ग येथे जल्लोष

भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत केला विजयोत्सव

*⚡दोडामार्ग ता.३१ सुमित दळवी-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत महाविकास आघाडीला धूळ चारली.अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा राणे फॅक्टरच दिसून आला.या विजयाचा दोडामार्ग भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा केला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस,माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण,रंगनाथ गवस,राजू प्रसादि,दीपक गवस,संध्या प्रसादि, सुनील गवस,समीर रेडकर,नितीन मणेरीकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते

You cannot copy content of this page