कै. श्रीधर नाईक यांना केले अभिवादन ;मतदारांचे मानले आभार
*⚡कणकवली ता.३१-:* जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून तो आम्ही मान्य केला आहे. जिल्ह्यातील सहकार टिकला पाहिजे, अशी महाविकास आघाडीची भूमिका होती. माझ्या विजय होण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त करतो प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी व्यक्त केली. जिल्हा बँक निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर सुशांत नाईक यांचे कणकवलीत आगमन झाल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सुशांत नाईक यांनी कै. श्रीधर नाईक यांना अभिवादन केले यावेळी त्यांच्या समवेत आमदार वैभव नाईक व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा बँक निवडणुकीच्या जिल्हा पतसंस्था मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नवखे उमेदवार सुशांत नाईक यांनी भाजपाच्या राजन तेली यांचा पराभव केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत ते जायंट किलर ठरले आहेत. बँकेच्या 19 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला 11 तर महाविकास आघाडीला 8 जागा मिळालेल्या आहेत. या निवडणुकीत दिग्गज उमेदवारांना पराभवाची धुळ चाखावी लागली आहे. सुशांत नाईक यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडताना आम्ही जिंकण्यासाठी निवडणुकीत उतरलो आहे, असा निर्धार केला होता. तो निर्धार त्यांनी सत्यात उतरून दाखवून प्रतिस्पर्धाला पराभवाची धुळ चारली आहे.
