कंझ्युमर्स प्रॉडक्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचा १२वा वर्धापनदिन २ जानेवारी रोजी

वेंगुर्ला प्रतिनिधी- कंझ्युमर्स प्रॉडक्स डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन, सिधुदुर्ग जिल्ह्याचा १२वा वर्धापनदिन सोहळा व स्नेहमेळावा रविवार दि.२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ५ पर्यंत साई डिलक्स हॉल, सुंदर भाटले, वेंगुर्ला येथे आयोजित केला आहे. तरी जिल्ह्यातील वितरक बंधूंनी आपले व्यावसायीक कामकाज बंद ठेऊन यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष अरविद नेवाळकर व वेंगुर्ला तालुकाध्यक्ष लक्ष्मण गावडे यांनी केले आहे.

या सोहळ्याचे उद्घाटन सीपीडीएचे संस्थापक अनिल सौदागर यांच्या हस्ते होणार असून यावेळी ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, महाराष्ट्र राज्य कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष अमोल मेहता, ऑल गोवा एफ.एम.जी.सी.व टेलिकॉम डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे शिवदास कुरतरकर, कोल्हापूर झोन अध्यक्ष विजय नारायणपुरे, सचिव-ऑल गोवा एफ.एम.जी.सी.व टेलिकॉम डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे सचिव चेतन कापडी तर डी.बी.देसाई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच मेळाव्यात सत्कार समारंभ व चर्चासत्र असे कार्यक्रम होणार आहेत.

You cannot copy content of this page