फटाक्यांची आतषबाजी करत मालवण मध्ये पदाधिकाऱ्यांनी साजरा केला विजयाचा आनंदोत्सव…

मालवण (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, राणे साहेब अंगार है, बाकी सब भंगार है, नितेश राणेंचा विजय असो, निलेश राणेंचा विजय असो अशा जोरदार घोषणा देत आणि फटाक्यांची आतषबाजी करत मालवणात भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँक निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा आनंद व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी ११ जागांवर विजय मिळवीत महाविकास आघाडीचा पराभव करत बँकेवर आपली सत्ता मिळविल्याने मालवणात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी भरड नाका येथे फटाके वाजवून आणि विजयी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. जोरदार विजयी घोषणा देत भाजप पदाधिकाऱ्यांनी आसमंत दणाणून सोडला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, जगदीश गावकर, विजय केनवडेकर, आबा हडकर, सूर्यकांत फणसेकर, भाऊ सामंत, पंकज पेडणेकर, उत्तम पेडणेकर, विनायक मोरजकर, भाजप युवमोर्चा मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण, निनाद बादेकरआदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page