वैभव म्हैसकर स्मृती प्रित्यर्थ अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

कणकवली 31 डिसेंबर (प्रतिनिधी)- जय केसरकर मित्र मंडळ (वर्दे) व स्पोर्टृस बॉईज नाबरवाडी आयोजित कै. वैभव म्हैसकर स्मृती प्रित्यर्थ भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १ ते २ जानेवारी २०२२ रोजी नाबरवाडी कुडाळ येथे भव्य अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व क्रिकेट संघ व क्रिकेट रसिकांनी स्पर्धेसाठी १ जानेवारी रोजी सकाळी ९वाजता उपस्थित राहावे.

या स्पर्धेला प्रथम पारितोषिक माजी नगरसेविका सौ. श्रेया शेखर गवंडे पुरस्कृत ५००० /- रू. व आकर्षक चषक तसेच द्वितीय पारितोषिक ओ.बी.सी. सेल जिल्हाप्रमुख, सिंधुदुर्ग श्री. रूपेश पावसकर पुरस्कृत ३०००/- रू. व आकर्षक चषक राहिल. तसेच श्री. श्रीराम काजरेकर व श्रीम. विमल म्हैसकर पुरस्कृत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, अंतिम सामन्यातील मॅन ऑफ दि मॅच व मॅन ऑफ दि सिरीज यांना सुद्धा चषक देवून खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी रु.५००/- असून केवळ रू. ५००/- मध्ये रि एन्ट्री ची सुद्धा सुवर्णसंधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. नाबरवाडी, पाचेकरवाडी रोड, (श्री. काजरेकर यांच्या घराजवळ.) कुडाळ येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ,तरी इच्छुक संघांनी अभय आपटे (9422373104) किंवा मकरंद आपटे (9284224547) यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page