Headlines

Global Maharashtra Breaking News

‘विद्याविहार’चे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले

*⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यातील आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचे दोन विद्यार्थी माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले आहेत. काजल सुनील मुळीक व विराज अनंत प्रभुसाळगावकर या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे अध्यक्ष रामचंद्र ऊर्फ अण्णा झांट्ये यांच्यासह पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक…

Read More

२००२ साली नियुक्त शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर होणार

शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षक भारतीची सकारात्मक चर्चा *⚡ओरोस ता.१२-: २००२ साली नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दुर करण्यासह विविध विषयांवर शिक्षणाधिकारी श्री. मुश्ताक शेख व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग यांच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा संपन्न झाली. गेली चार वर्षे या बाबत शिक्षक भारतीने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.या त्रुटी दुर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व प्रायोगिक…

Read More

“गुरू माऊली भालचंद्र योगी” चित्रपट युट्युबवर लवकरच प्रदर्शित होणार

*⚡कणकवली ता.१२-:* प.पु.बाबा भालचंद्र महाराज यांच्या जीवनावर आधारित, थोर उद्योगपती कै नामदेवराव मराठे यांनी निर्मित “गुरू माऊली भालचंद्र योगी” चित्रपट युट्युबवर लवकरच प्रदर्शित होणार आहे यानिमित्ताने भालचंद्र महाराज यांचा जीवन चरित्रपट भाविकासमोर येणार आहे. निर्माता/दिग्दर्शक (राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते) राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि आहुजा कंपनीचे सर्वेसर्वा यांच्या अथक परिश्रमानंतर लवकरच घरोघरी, प्रत्येकाच्या मोबाईलवर पहायला…

Read More

हुतात्मा दत्ताराम कोयंडे शाळेचा १११ वा स्थापना दिन साजरा

नित्यानंद तळवडकर यांची उपस्थिती मालवण दि प्रतिनिधी आचरा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे प्राथमिक शाळेचा १११ वा वर्धापन दिन सोहळा शाळा समिती अध्यक्ष नित्यानंद तळवडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांच्या सोबत मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर,पोलीस पाटील विठ्ठल धुरी, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता धारक विद्यार्थी…

Read More

कोल्हापूर व रत्नागिरी बसफेरी आजपासून सुरू

कुडाळ,कणकवली,वेंगुर्ले व देवगड फेऱ्याही सुरू;आगारप्रमुख सचिदानंद बोवलेकर यांचे प्रवाशांना लाभ घेण्याचे आवाहन मालवण दि प्रतिनिधी मालवण एसटी आगारातून आज बुधवार पासून मालवण- रत्नागिरी व मालवण कोल्हापूर या बसफेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली. तसेच कुडाळ, कणकवली वेंगुर्ले, देवगड या मार्गावर फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून त्याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन…

Read More

जिल्ह्यातील सरसकट शाळा बंद नको

प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन *⚡सिंधुदुर्गनगरी ता १२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना संसर्ग प्रादुर्भावाच्या काळात सरसकट बंद केलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांपैकी काही शाळा नियमांना बांधील राहून पुन्हा सुरू करण्यास मान्यता द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाधकाऱ्यांकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय…

Read More

चिंदर ग्रामपंचायत येथील ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

*⚡मालवण ता.१२-:* चिंदर ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश गणपत कदम यांचा निरोप समारंभ ग्रामपंचायत चिंदरच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला. सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे यांंनी कदम यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कणकवली, घोणसरी, जानवली, कलमठ, रामगड, देवबाग असा ग्रामसेवक म्हणून प्रवास…

Read More

नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

*⚡मालवण ता.१२-:* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत ऑगस्ट २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत नामदेव शंकर कावले इंग्लिश मिडीयम स्कुलने यश संपादन केले आहे. या परीक्षेत अपेक्षा कांदळगावकर, सॅव्हिया फर्नांडिस, सानिका जोशी यांनी शिष्यवृत्ती पटकाविली आहे. सन २०२०- २१मध्ये घेतल्या गेलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये नामदेव शंकर कावले इंग्लिश मीडियम स्कूल…

Read More

शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे यश

*⚡कणकवली ता.१२-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलच्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या एकूण ४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये यश संपादित करीत शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. इयत्ता ५ वी ग्रामीण सर्वसाधारण गटातून संस्कार…

Read More

हेदूळ आरोग्य उपकेंद्राला ऑफिस टेबल भेट

*⚡मालवण ता.१२-:* मालवण तालुक्यातील हेदूळ गावातील आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य वर्धिनी केंद्राला आवश्यक असणारे ऑफिस टेबल सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक एस. पी. सामंत यांनी प्रदान केले. त्यावेळी सरपंच श्री. नंददिपक गावडे, डाॅ. महादेव हरमळकर, आरोग्य सेवक राजन गवस, सौ. शलाका नार्वेकर, सारिका चव्हाण आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल श्री. सामंत यांचे आभार मानण्यात आले.

Read More
You cannot copy content of this page