*⚡कणकवली ता.१२-:* प.पु.बाबा भालचंद्र महाराज यांच्या जीवनावर आधारित, थोर उद्योगपती कै नामदेवराव मराठे यांनी निर्मित “गुरू माऊली भालचंद्र योगी” चित्रपट युट्युबवर लवकरच प्रदर्शित होणार आहे यानिमित्ताने भालचंद्र महाराज यांचा जीवन चरित्रपट भाविकासमोर येणार आहे.
निर्माता/दिग्दर्शक (राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते) राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि आहुजा कंपनीचे सर्वेसर्वा यांच्या अथक परिश्रमानंतर लवकरच घरोघरी, प्रत्येकाच्या मोबाईलवर पहायला मिळणार आहे.सर्व कलावंत स्थानिक असुन सर्वानीच अप्रतिम अभिनय केला आहे. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आहुजा कंपनीचे सर्वेसर्वा यांचे अथक परिश्रम करून चित्रपट युट्युब च्या माध्यमातून उपलब्ध केल्या बद्दल त्यांचे आभार मानले. यासंदर्भातील माहिती संदर्भात राजेंद्र मनोहर पेडणेकर (९५०३००५१६३/९४२२३५४९१८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
